रसवंती गृहांची नावे 'कानिफनाथ, नवनाथ' का असतात?

अंकिता खाणे (Ankita Khane)

उन्हाळ्यात आपल्याला जागोजागी रसवंती गृह दिसतात. त्या रसवंती गृहांवर बऱ्याचदा आपल्याला कानिफनाथ आणि नवनाथ अशीच नावं दिसतात.

या गोष्टीला खूप जुना आणि मोठा इतिहास आहे. काय आहे तो नेमका इतिहास, आणि महाराष्ट्रातील सगळ्या रसवंतीगृह आला कानिफनाथ आणि नवनाथ ही दोन नावच का ते आपण जाणून घेऊया.

रसवंती गृहांच्या नावाच्या मागचा इतिहास काय आहे

रसवंतीगृहांना नवनाथ किंवा कानिफनाथ ही दोन्ही नावे असण्यामागे एक धार्मिक कथा आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांचा जन्म हा हत्तीच्या कानापासून झाला.

तर हत्तीचे आवडते खाद्य म्हणजे ऊस. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीपासून झाल्याने त्यांना सुद्धा ऊस आवडत अशी अख्यायिका आहे.

त्यामुळे ऊसाचा व्यवसाय करायचा असल्याने श्रद्धेच्या भावनेने अनेक जण रसवंती गृहला नवनाथ किंवा कानिफनाथ असे नाव देतात.

हे सगळं पारंपारिक रित्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण हे सारे इथेच संपत नाही.

उसाच्या रसाचा व्यवसाय करणारे बरेचसे लोक पुणे जिल्ह्यातील एका गावातून येतात हे देखील अनेकांना माहिती आहे.

अख्ख्या महाराष्ट्राला रसवंतीगृह देणार गाव म्हणजे बोपगाव

पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील बोपगाव नजिक च्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपेकी एक कानिफनाथ महाराज ध्यानाला बसले होते.

तिथे त्यांचं मंदिर देखील आहे. तिथे व्यवसाय करणाऱ्या भक्तांनी रसवंतीगृहाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ ठेवले आणि ती प्रथा आजही अशीच भावनेने जपली जाते आहे.

इथल्या गावकऱ्यांचे हे मंदिर म्हणजे कुलदैवत.आज देखील येथे राहणारी लोक नवनाथांची तितक्याच आस्थेने पूजा करतात

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea
येथे क्लिक करा