कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवणार का? अभिनेत्रीच्या वडिलांनी दिलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

समकालीन प्रश्नांवर खुलेपणाने मत

कंगना रणौत मनोरंजन विश्वासोबतच देशाच्या समकालीन प्रश्नांवर खुलेपणाने आपले मत मांडताना दिसते.

Kangana Ranaut

भविष्यात राजकारणात

गेल्या काही महिन्यांपासून कंगनाची ही आवड तिला भविष्यात राजकारणात आणू शकते, असा अंदाजही वर्तवला जात होता.

Kangana Ranaut

या वृत्तांवर मौन सोडले

कंगना 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी या वृत्तांवर मौन सोडले आहे आणि सत्य उघड केले आहे.

Kangana Ranaut

लोकसभा निवडणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतचे वडील अमरदीप यांनी पुष्टी केली आहे की अभिनेत्री भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

Kangana Ranaut

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार

अमरदीप राणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार आहे.

Kangana Ranaut

याचा निर्णय पक्ष घेईल

त्याचवेळी कंगना राणौतच्या वडिलांनीही ती कुठून निवडणूक लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे स्पष्ट केले.

Kangana Ranaut

जेपी नड्डा यांची भेट घेतली

रविवारी कंगना राणौतने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत कुल्लू येथील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut