Miyazaki Mango : हापूस विसरा, अयोध्येत पिकला 3 लाख रुपये किलोचा आंबा; पहिलं फळ थेट 'राम लल्ला'च्या चरणी अर्पण!

बाळकृष्ण मधाळे

सर्वात महागड्या आंब्यानं वेधलं लक्ष

कोकणचा हापूस आंबा आपल्या चवीसह आणि उच्च बाजारभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यंदा एका वेगळ्याच आणि जगातील सर्वात महागड्या आंब्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

जपानमधील प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंबा

जपानमधील प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंबा, ज्याला ‘एग ऑफ द सन’ म्हणूनही ओळखले जाते, आता अयोध्येच्या मातीत यशस्वीपणे पिकवण्यात आला आहे.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

रामलल्लाच्या चरणी अर्पण

विशेष म्हणजे, या दुर्मिळ आंब्याचे पहिले फळ अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामलल्लाच्या चरणी अर्पण करण्यात आले.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

‘मियाझाकी’ची किती किंमत?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘मियाझाकी’ आंब्याची किंमत तब्बल २.५ लाख ते ३ लाख रुपये प्रति किलो इतकी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा आंबा जगातील सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक मानला जातो.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

दोन वर्षांपूर्वी रोपांची लागवड

अयोध्येतील शेतकरी ओमप्रकाश सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर या आंब्याच्या रोपांची लागवड केली होती.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

अयोध्येच्या हवामानात झाड टिकणार!

सुरुवातीला अनेकांनी अयोध्येच्या हवामानात हे झाड टिकणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, सर्व अंदाज खोटे ठरवत हे झाड स्थानिक वातावरणात चांगलेच रुजले.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

डझनभर फळे लागली

यंदाच्या हंगामात या झाडाला सुमारे डझनभर फळे लागली असून, एका आंब्याची किंमत जवळपास एक लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

पहिलं फळ देवाला अर्पण

भारतीय परंपरेनुसार, बागेतील पहिले फळ देवाला अर्पण करण्याची प्रथा जपत ओमप्रकाश सिंह यांनी झाडावरील पहिले मियाझाकी आंब्याचे फळ तुळशीपत्रासह रामलल्लाला अर्पण केले.

Ayodhya farmer grows Miyazaki mango

|

esakal

Health Benefits of Mango : दिवसातून एक आंबा खा अन् 'या' 5 गंभीर आजारांपासून दूर राहा; हृदयाच्या आरोग्यासाठीही आहे गुणकारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mango nutrition facts and benefits

|

esakal

येथे क्लिक करा...