हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर...

Aishwarya Musale

थंडीच्या दिवसात बाजारात हिरवेगार वाटाणे (मटार) देखली दिसायला सुरुवात होते. हिरवा वाटाणा हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडतो.

शिवाय हिरव्या वाटाण्यापासून अनेक पदार्थही तयार करता येतात. जसे की, हिरव्या वाटाण्याची भाजी, कबाब, पराठे, सार, पुलाव भात अशा विविध पदार्थांत वाटाण्याचा समावेश केला जातो. 

पण, हा हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीसुद्धा तितकाच फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही असतात. हिरव्या वाटाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात.

कोलेस्ट्रॉल वाढते

मटारमध्ये नियासिन भरपूर प्रमाणात असते, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

वजन कमी करण्यात फायदेशीर

मटारच्या फायद्यांमध्ये वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लवकर लागत नाही.

दृष्टीसाठी फायदेशीर

मटारमध्ये ल्युटीन आणि झेक्साथिम नावाचे दोन विशेष घटक आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

गरोदरपणात फायदेशीर

आयर्न कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडसोबतच मटारमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात, जे गर्भवती महिलेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात, या कारणास्तव असे मानले जाते की गर्भवती महिलांनी मटारचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे.

सांधेदुखीमध्ये फायदेशीर

मटारच्या फायद्यांमध्ये सांधेदुखीपासून मुक्ती मिळते कारण त्यात सेलेनियम नावाचा एक विशेष घटक आढळतो. तज्ज्ञांच्या मते, सेलेनियम संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.

व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.