Cucumber benefits : केवळ थंडच नाही, तर आरोग्यवर्धकही; काकडी आहे आरोग्याच्या या आजारांवर रामबाण उपाय!

सकाळ वृत्तसेवा

Surprising Benefits Of Cucumber : सॅलड हा शब्द आपण वापरतो, तेव्हा सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर काकडी येते. हे एक वेलीवर येणारे फळ असून, हिरव्या-पिवळ्या-पांढरट व पिवळसर रंगात उपलब्ध असते. बेबी काकडीपासून फूटभराच्या लांबीतही हे फळ मिळते.

पिकलेली काकडी मऊ होते व चवीला चांगली नसते. औषधासाठी अशी काकडी वापरली जात नाही. काकडी सालीसकट आणि बियांसकट खाल्ली जाते. संपूर्ण वर्षभर मिळते; परंतु उन्हाळ्यात तिचा स्वाद काही औरच असतो. स्त्रियांसाठी हे फळ लाभदायी, आरोग्यदायी असून वापरास अत्यंत सोपे असते.

प्रमुख उपयुक्त तत्त्वे

‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘के’ जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम, लोह, जस्त, फ्लुराईड, तंतुमय पदार्थ इत्यादी.

अंगावरील सूज ः शरीरातील अनावश्यक पाण्याचा निचरा होत नसेल, तर पेशींमध्ये हे पाणी साठून हात-पाय-चेहऱ्यावर-पोटावर सूज येते. पाळी जाताना होणारे संप्रेरकांचे आंदोलन, किडनी विकार, औषधाचे दुष्परिणाम, अति साखर/मिठाचा वापर इत्यादी कारणांनी हा त्रास होतो, अशा वेळी मूत्रल गुणधर्माची औषधे दिली जातात.

काकडीचा या औषधांच्या जोडीने वा प्राथमिक अवस्थेत उपयोग करता येतो. मूत्राद्वारे अतिरिक्त पाणी बाहेर काढून सूज उतरण्यास फायदा होतो. काकडीचा आहारात रोज वापर करावा. दिवसातून दोन मध्यम आकाराच्या काकड्या खाणे गरजेचे आहे.

मुखदुर्गंधी

सकाळची डबा आणि ऑफिसची घाई, रात्री थकल्यामुळे झोपेची घाई, दिवसा ऑफिसमध्ये जेवणाची घाईगडबड या दिनक्रमात दातांची व मुखाची स्वच्छता/काळजी घेण्यास स्त्रिया कमी पडतात व त्यामुळे अनेकदा मुखदुर्गंधीस सामोरे जावे लागते. काकडीच्या ताज्या चकत्या चोखाव्यात. एकेक चकती टाळूवर जिभेने दाबून धरावी. जेवणानंतरही काकडी खावी. यातील फायटोकेमिकल्स दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूचा नाश करण्यास उपयोगी पडतात.

सांधेदुखी

ह्युमॅटिझम, गाऊट, आर्थ्रायटिस इत्यादीमुळे स्त्रियांना सांधेदुखी होते. सांधेदुखी कमी करण्यासाठी काकडीत असणारा सिलिका हा घटक उपयुक्त ठरते. सांध्यांना त्यामुळे ताकद येते, सांध्यांतील मऊ अस्तर सुधारते. सांध्यांभोवतीची टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकली जातात (विशेषतः युरिक ॲसिड), त्यामुळे आपोआपच सूज कमी होते, सांधे शिथिल होतात, वेदना कमी होऊन हालचाली सुकर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.