
Health Benefits of Avocado
sakal
Amazing Health Benefits of Avocado: पोषक मूल्यांचा विचार करायचा झाला, तर "ऍव्हाकाडो'त व्हिटॅमिन "बी', "सी' व "इ' आणि फायबर मिळतं. त्याबरोबर यात फॅटचंही भरपूर प्रमाण आहे. चीज, बटर वा क्रीम खाण्यापेक्षा कॅलरीज असलेलं ऍव्हाकाडो खाणं कधीही चांगलं. अगदी ब्रेडवर लोणी वा चीजऐवजी ऍव्हाकाडोचा गर पसरला तरी छान लागतं. मधुमेह, हृदयरोग वा रक्तदाबासारखा त्रास असलेल्यांनीही ऍव्हाकाडो खाल्लं तरी चालतं. या फळात कोलेस्ट्रॉल लेव्हल मेंटेन करण्याचा गुणधर्म आहे.