Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या हंगामात काल झालेल्या सामन्यात मुंबईने १४ वर्षाचा दुष्काळ संपवत सलामीचा सामना आपल्या नावावर केला. नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या कोलकाता संघाचा फिनआणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली , अजिंक्यने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल, आणि मुंबईला २२१ धावांचे लक्ष्य दिले. मुंबईने रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. २०२१ मध्ये चेन्नईविरुद्ध त्यांनी २१९ धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज मोडला गेला. हा सामना संपल्याननंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेना संघातील सर्वात महागडा गोलंदाज कॅमेरॉन ग्रीनच्या गोलंदाजी बद्दल विचारले असता त्याने अस काही उत्तर दिल जे एकूण चाहत्यांना धक्का बसला आहे.

कोलकाता नाईट राइडर्सने कैमरून ग्रीनला लिलावात २५ करोड २० लाख रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील केल होत. मुंबई आणि कोलकाताचा सामना संपल्याननंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला कैमरून ग्रीन गोलंदाजी का करत नाही अस विचारल असता त्याने दिलेल उत्तर एकूण सगळेच थक्क झाले. रहाणे म्हणाला मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न ऑस्ट्रेलिया क्रिकेटला विचारा.

आता तरी आमचा संघ संतूलीत आहे. आमच लक्ष आता येणाऱ्या सामण्यांकडे आहे. फलंदाजी आमची चांगलीच आहे, पण गोलंदाजी कोण चांगली करेल हे पहाव लागेल. पुढे बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला कैमरून ग्रीन आताच दुखापतीतून बरा होऊन'आला आहे. मला अस वाटतंय की तो लवकरच गोलंदाजी सुरू करेल, आणखी तरी त्याने आता फलंदाजीच केलीय.

आयपीएल खेळण्या अगोदर कैमरून ग्रीनने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया कडून शेफील्ड शील्डमध्ये ८ सामने खेळले होते परंतू गोलंदाजी केली नव्हती. बऱ्याच प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे कोलकाताच्या समस्या वाढल्या आहे, अस रहाणेने मान्य केले आहे. कोलकाता संघात फिरकी गोलंदाजीवरील दबाव कमी करायचा असेल तर एक वेगवान गोलंदाज असणे महत्त्वाचे आहे कैमरून ग्रीनने जर गोलंदाजी केली तर आमचा संघ आणखी मजबूत होईल अस रहाणे म्हणाला.

तुम्हाला कोणत्या बातम्या वाचायला आवडतात? एक मिनिटाचा हा सर्वे भरून आम्हाला नक्कीच सांगा. इथे भरा: https://3ofmdvm6sbw.typeform.com/to/v7pynEzq

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.