#WeCareForPune डुक्करखिंडीतल्या रस्ता धोकादायक

सचिन शहा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

कोथरुड  : कात्रज देहुरोड महामार्गावरुन कोथरुडकड़े येणारे वाहनचालक वंडर फ्युचुरा सोसाटीच्या शेजारुन डुक्कर खिंडीतून महात्मा सोसायटीकडून पुढे कोथरुडला येतात. ज्यामुळे चांदनी चौक व पौड़ रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होतो व् प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो. पण कित्येक महिन्यांपासून या 100 मीटर अंतराच्या रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी तर 9-12 इंच एवढे खड्डे आहेत. रोज छोटे मोठे अपघात होऊन वाहनेपण खिळखिळी होत आहेत.
 
वेळोवेळी पीएमसीकेअरवर तक्रार करून सुद्धा येथील कामे होत नाही. हा भाग महापालकेच्या अधिकृत रस्त्यांमध्ये येत नाही असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित पक्के रस्ते आहेत. दूसरीकड़े डीपी रस्त्याचे गरज नसतांना सिमेंटीकरणाचा घाट घातला आहे.  तरी या भागातील लोकप्रतिनिधिंनी यात लक्ष देणे गरजेचे आहे.

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: #WeCareForPune Dangerous road in dukkar khind