

Vastu Tips: Best Colors for Painting Your Home for Prosperity and Peace
esakal
Vastu tips for home painting: दिवाळी हा प्रकाश, उमेद, आनंद आणि मांगलिक गोष्टींचा महाउत्सव मानला जातो. या सणापूर्वी प्रत्येक जण घराची कसून साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावट करण्यास सुरुवात करतो. धार्मिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मीचा वास त्याच घरात असतो जिथे स्वच्छता आणि प्रसन्नता नांदते. दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताना जर वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Shastra) सांगितलेल्या नियमांची आणि रंगांच्या महत्त्वाची काळजी घेतली, तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू शकते. घराच्या प्रत्येक भागासाठी वास्तुशास्त्रानुसार कोणते रंग शुभ मानले जातात, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.