

Numerology Warning: Why Avoid Sharing Secrets with Mulank 3 & 5
esakal
Numerology Personality Traits: प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावातील गुण-दोष, आवडी-निवडी आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक महत्त्वाची माहिती समोर येते. अंकशास्त्रानुसार (Numerology), काही लोक मनातील गुपिते जपण्यात अत्यंत पटाईत असतात, तर काहींच्या बाबतीत खाजगी गोष्टी शेअर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे मानले जाते.
अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ आणि मूलांक ५ असलेल्या व्यक्तींशी आपल्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील किंवा गुप्त गोष्टी सांगताना सतर्क राहावे. या दोन्ही मूलांकांच्या व्यक्तींच्या बोलक्या स्वभावामुळे नकळतपणे तुमच्या खाजगी गोष्टी इतरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.