

Historic Abraham Lincoln Photograph With Signature Sells for 149020 Dollars in a Record Breaking Auction of American Memorabilia
sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्वाक्षरीचे एक दुर्मीळ छायाचित्र तब्बल एक लाख ४९ हजार २० डॉलरला (अंदाजे १.३ कोटी रुपये) लिलावात विकले गेले. अनेक दशके एका कुटुंबाकडे जपून ठेवलेल्या या छायाचित्राचा ऐतिहासिक संदर्भ जुन्या वृत्तपत्राच्या कात्रणामुळे उलगडला. ‘आरआर ऑक्शन’ या लिलाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या छायाचित्राला अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनेची पार्श्वभूमी आहे.