

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांशी निकटचे संबंध असल्याचा दावा करत लोकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जवळपास तीन वर्षे कारागृहात असलेल्या मोहम्मद काशिफ याला सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला.