Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Ganga Dussehra 2026 Celebrations Across India: गंगा दशहरा हा माता गंगेच्या पृथ्वीवरील अवतरणाचा पवित्र उत्सव मानला जातो. राजा भगीरथांच्या अथक तपस्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरली, अशी पौराणिक मान्यता आहे.
Ganga Dussehra

Ganga Dussehra

esakal

Updated on

आज २५ मे २०२६ रोजी संपूर्ण देशात अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भक्तीभावाने 'गंगा दशहरा' (Ganga Dussehra) महाउत्सव साजरा केला जात आहे. आज सोमवारच्या दिवशी हा पावन पर्व आल्यामुळे याचे आध्यात्मिक महत्त्व आणि पुण्य लाभ दुप्पट झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र भाविकांनी गंगा किनाऱ्यावर गर्दी केली असून तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यवासीयांना शुभेच्छा देताना प्रशासनाला कायदेव्यवस्था नीट ठेवून विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com