

नवी दिल्ली : सिंधू पाणी वाटप करार थंडबस्त्यात टाकण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पाणी रोखण्यासाठी अल्पकालीन, मध्यम कालावधीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची घोषणा सरकारने केली आहे. लवकरच या नद्यांमधील गाळ काढण्यात येणार असून पाकिस्तानला जाणारे पाणी अन्यत्र वळविण्यात येईल, असे जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी जाहीर केले.