

Lucknow Chikankari
esakal
नजाकत आणि नफासतचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊची (Lucknow) ख्याती संपूर्ण जगात तिथल्या आदरातिथ्यासाठी आणि लजीज खाद्यसंस्कृतीसाठी आहे. मात्र, लखनऊबाबत एक म्हण अत्यंत प्रसिद्ध आहे की, "येथे चिकन खाल्लेही जाते आणि परिधानही केले जाते!" येथे खाल्ल्या जाणाऱ्या चिकन बिर्याणीइतकीच इथली 'चिकनकारी' (Lucknow Chikan) ही वस्त्रकला जगभरात प्रसिद्ध आहे.