HPV Vaccination : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी केंद्राची मोहीम यशस्वी; कमी काळात एक कोटींहून अधिक लसींचे वितरण

National HPV Vaccination Campaign | One Crore Vaccine Doses Milestone : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहिमेने एक कोटी लसींचा टप्पा पार केला आहे. १४ वर्षांच्या मुलींच्या लसीकरण मोहिमेतील या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.
HPV Vaccination

HPV Vaccination

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून किशोरवयीन मुलींचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या देशव्यापी मोहिमेअंतर्गत अवघ्या नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एक कोटींहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...