Sports Complex Inaugurated Amid Mobile Torchlights March Past by Athletes from Six Countries
sakal
मध्य प्रदेशातील क्रीडा पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या नाथू बरखेडा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते रविवारी (२२ नोव्हेंबर) करण्यात आले. भोपाळमध्ये १३४ एकर परिसरात सुमारे १,००० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या संकुलाचे लोकार्पण विधिवत पूजन आणि उपस्थित नागरिक व खेळाडूंच्या मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात करण्यात आले. या सोहळ्यात सहा देशांच्या संघांनी संचलन केले, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा गौरव वाढवणाऱ्या खेळाडूंना ९ कोटी २३ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर धनादेश वितरित करण्यात आले.