दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

WhatsApp OK Message Does Not Confirm Leave Approval : व्हॉट्सॲपवर बॉसचा ‘OK’ मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे, असा निर्णय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने देत रेल्वे कर्मचाऱ्याची बदलीविरोधातील याचिका फेटाळली.
CAT Allahabad rules that a superior officer's WhatsApp OK message is not conclusive proof of leave approval and dismisses a railway employee's transfer petition

CAT Allahabad rules that a superior officer's WhatsApp OK message is not conclusive proof of leave approval and dismisses a railway employee's transfer petition

esakal

Updated on: 

व्हॉट्सॲपवर वरिष्ठ अधिकाऱ्याने रजेच्या विनंतीला ‘ओके’ असा प्रतिसाद दिला, म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याने रजा मंजूर केली, असे ठोसपणे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) दिला आहे. संबंधित कालावधीत विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होती आणि रजा मंजूर करण्याचे अधिकारही त्याच अधिकाऱ्याकडे होते. त्यामुळे केवळ व्हॉट्सॲपवरील संदेशाच्या आधारे रजा मंजूर झाल्याचा दावा ग्राह्य धरता येणार नसल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. या प्रकरणात प्रयागराजहून फतेहपूर येथे करण्यात आलेल्या बदलीला आव्हान देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याची याचिका न्यायाधिकरणाने फेटाळून लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com