Career News : 3 करोडच्या पॅकेजबरोबरच एलपीयूने रोजगार संधींमध्ये एक नवीन विक्रम केलाय!

LPU चा प्लेसमेंट डेटा त्याच्या स्थापनेपासूनच उत्कृष्ट आहे. त्यात दोन हजारपेक्षा जास्त कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येत असतात.
LPU
LPUSakal

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एलपीयू) 2018 च्या वर्गातील विद्यार्थी, यासिर एम याने जागतिक दर्जाच्या आयटी कंपनीत तब्बल ३ करोडचे पॅकेज मिळवले आहे. तो आता आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगमध्ये काम करणार आहे. एलपीयूमधून पदवी घेतल्यानंतर त्याने दुसरी कोणतीही पदवी घेतली नाही. कारण त्याला गरजच भासली नाही.

एलपीयूमध्ये मिळवलेल्या उत्तम दर्जाच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक मूल्यांमुळेच हे साध्य झाल्याचं त्याला वाटतं. आणि ही अशी उत्तम संधी काही केवळ यासिरपुरतीच मर्यादित नाही. तर त्याच्यासारखे एलपीयूचे अनेक माजी विद्यार्थी गुगल, अॅप, मायक्रोसॉफ्ट, मर्सिडीझ आणि इतर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये १ करोड आणि त्यापेक्षा जास्त पॅकज घेऊन काम करत आहेत.

LPU चा प्लेसमेंट डेटा त्याच्या स्थापनेपासूनच उत्कृष्ट आहे. त्यात दोन हजारपेक्षा जास्त कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येत असतात. त्यात अशाही मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे ज्या आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांतून कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत विद्यार्थ्यांची निवड करतात.

LPU Placement Day 2022
LPU Placement Day 2022Sakal

यासिरने त्याच्या संपूर्ण प्रवासात LPU च्या प्राध्यापकांचे आणि व्यवसाय रोजगार देणाऱ्या विभागाचे आभार मानले तसेच त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाने व्यवसायिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवावर जास्त भर दिल्याने त्याला नोकरी मिळण्यात त्याचा उपयोग झाल्याचे त्याने नमूद केले. तसेच विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या विविध अभ्यासेतर उपक्रमांमुळे त्याला व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्य विकसीत होण्यात मदत झाल्याचे त्याने सांगितले.

शिवाय, LPU B.Tech. पदवीधर हरेकृष्ण महतोने गुगलकडून ६४ लाखाचे पॅकेज मिळवले आणि बंगळुरुमधल्या गुगलच्या ऑफिसमध्ये तो काम करत आहे. अशाप्रकारे उत्तम पॅकेज मिळवणारा तो अत्यंत तरुण पदवीधर आहे. मागील काही बॅचमधून, 600 हून अधिक LPU विद्यार्थ्यांना 10 लाखांपासून ते 63 लाखापर्यंतची पॅकेज मिळाली आहेत.

एलपीयूमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारीभरती करणाऱ्या कंपन्यांमध्ये कॉग्निझंट (१८५०हून अधिक विद्यार्थ्यांची भरती), कॅपजेमिनी (१४०० अधिक विद्यार्थ्यांची भरती) विप्रो (५००हून अधिक विद्यार्थ्यांची भरती) MPhasis (२३०हून अधिक विद्यार्थ्यांची भरती) आणि Highradius (८००हून अधिक विद्यार्थ्यांची भरती) केली आहे. त्यांच्याबरोबर इतरही अनेक कंपन्यांचा यात समावेश आहे. अलिकडच्याच काही वर्षांत LPU विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपन्यांकडून २०,००० हून अधिक प्लेसमेंट्स/इंटर्नशिप ऑफर आल्या आहेत. जवळपास ५०० फॉर्च्युन कंपन्यांनी ५००० हून अधिक ऑफर्स वाढवल्या आहेत.

परीक्षा व प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

LPU त्याच्या उद्योग-संरेखित अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध आहे, सतत बदलणाऱ्या जॉब मार्केटच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो डिझाइन केलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्यासाठी आणि इंडस्ट्री एक्सपोजर मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ Google, Microsoft, CompTIA, Transorg Analytics, IBM आणि इतर अनेक उद्योग प्रमुखांसह जोडले गेले आहे. विद्यापीठाने 300 पेक्षा जास्त उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी टाय-अप केले आहेत, जे विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यास करण्याची आणि जागतिक दृष्टीकोन मिळविण्याची संधी देतात.

LPU च्या 2023 च्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख अगदी जवळ आलेली आहे. येथे प्रवेश घेणेसुद्धा खूपच आव्हानात्मक असते कारण त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा LPUNEST2023 आणि वैयक्तिक मुलाखती (केवळ काही अभ्यासक्रमांकरता) या दोन्हीतून पार व्हावे लागते. तसेच अव्वल यावे लागते.

परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, विद्यार्थी येथे क्लिक करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com