

Board Exam Calculator Rule: Delhi HC Seeks CBSE Reply
esakal
Board Exam Calculator Rule: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक (Datesheet 2027) जाहीर केले असून, सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याबाबत वेगवान घडामोडी घडत असून, हा विषय आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
एकिकडे JEE एडवांस्ड 2027 मध्ये पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन कॅल्क्युलेटरचा नियम लागू करण्यात आला आहे, तर दुसरीकडे CBSE च्या 12वीच्या परीक्षेतही अशीच मुभा मिळावी, यासाठी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.