भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू मायदेशी परतले

भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू मायदेशी परतले
Updated on: 

जैसलमेर : भारतीय नागरिकत्व मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात पोहोचत असल्याचं समोर आलं आहे. परदेशी निर्वासितांना भारतीय नागरिकत्व न देण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानी हिंदू मायदेशी परतत असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानातील अत्याचारामुळे हिंदू भारतात आले होते. जुलै 2022 पर्यंत 334 पाकिस्तानी हिंदू निर्वासित पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

2021 पासून या वर्षापर्यंत सुमारे 1,500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांमध्ये निराशा पसरली आहे. यापैकी बहुतेक हिंदूंकडे भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पैसा किंवा कागदपत्रे नसल्यामुळे पाकिस्तानला परत जात आहेत, असं हिंदू सिंग सोढा यांनी सांगितले.

भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू मायदेशी परतले
शिंदे गट बुलढाण्यातून हद्दपार? बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर चर्चा

पाकिस्तानात सुमारे 25,000 हिंदू आहेत जे भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या 10 ते 15 वर्षापासून हे हिंदू येथे असून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची खात्री नसल्यामुळे राजस्थानातील जैसलमेर येथून 2021 ते या वर्षापर्यंत सुमारे 1,500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले असल्याची माहिती सोढा यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, 2004 आणि 2005 मध्ये नागरिकत्व देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 13,000 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळाले, परंतु गेल्या 5 वर्षांत केवळ 2000 पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यात आले.

पाकिस्तानातून स्थलांतर केलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियमानुसार, नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी, पाकिस्तानी स्थलांतरितांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करावे लागते आणि पासपोर्ट लागू होण्यासाठी पाकिस्तानी दूतावासाकडून प्रमाणपत्र देखील सादर करावे लागते. त्यामुळे हा खर्च जास्त होतो. हा खर्च करूनही भारताचे नागरिकत्व मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे पाकिस्तानी हिंदुंचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Google, Amazon and OpenAI on high alert; Websites offline
piyush goyal
piyush goyal and Minister for Economic Affairs Katherina Reiche
piyush goyal
Marathi News Esakal
www.esakal.com