Pakistan: कराचीत नाल्यामध्ये स्फोट! 12 जण ठार तर 12 जखमी

pakistan karachi explosion
pakistan karachi explosion

कराची : कराची शहरात शनिवारी झालेल्या स्फोटात १२ जणांचा मत्यू तर १२ जण जखमी झाले आहेत. शेरशाह पार्चा चौक येथे हा शक्तीशाली स्फोट (Karachi Explosion) झाला. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, असे शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो रुग्णालयातील ट्रामा सेंटरचे प्रमुख डॉ. साबिर मेमन यांनी सांगितले. सुरवातीच्या माहितीनुसार हा स्फोट एका नाल्यात झाला. (Pakistan Karachi Explosion)

स्फोटामुळे जवळील एका खासगी बँकेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार नाल्यात वायू गळती झाल्याने स्फोट झाला. मात्र काही लोकांनी ट्रान्सफॉर्मर किंवा अन्य गोष्टींमुळे स्फोट झाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com