Sagittarius Weekly Horoscope : धनु राशीची रखडलेली कामे अखेर मार्गी लागणार! करिअरमध्ये नवी जबाबदारी, आर्थिक लाभाचेही संकेत

धनु राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
Sagittarius zodiac sign August  23 to 29

Sagittarius zodiac sign August 23 to 29

sakal

Published on

धनु राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. बराच काळ रखडलेली कामे या काळात मार्गी लागू शकतात. कागदोपत्री अडथळे, मंजुरी किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिसादाची वाट पाहत असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल आणि पुढील नियोजनासाठी मोकळीक मिळेल.

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला आणि कल्पकतेला चांगला वाव मिळेल. नवीन प्रोजेक्ट, महत्त्वाची जबाबदारी किंवा एखादे आव्हानात्मक काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला कामाचा व्याप वाढल्यासारखा वाटेल; मात्र त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता असून, भविष्यातील प्रगतीसाठी हा अनुभव उपयुक्त ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com