Father's day : 'या' मराठी अभिनेत्रींनी शेअर केले वडिलांसोबतचे खास फोटो..

आज फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्रींनी आपल्या वाडिलांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
father's day : marathi actress shared post for their fathers
father's day : marathi actress shared post for their fathers sakal
Updated on

marathi actress : बाबांचं महत्व खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचं असतं. पण 'फादर्स डे' च्या निमित्तानं याच वडिलांविषयी काही तरी खास बोलण्याची संधी सगळ्यांना सापडते. आजच्या दिवशी अनेक सेलिब्रिटी वडिलांचं कौतुक करत,पोस्ट टाकत व्यक्त झाले आहेत. यामध्ये काही मराठी अभिनेत्रींचाही समावेश आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर, भार्गवी चिरमुले, रूपाली भोसले यांनी आपल्या बाबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या बालपणीची आठवण शेअर केली आहे. यामध्ये अपूर्वा आपल्या बाबांच्या हाताला धरून चालत आहे. मी तुमच्यासाठी कायम अशीच लहान मुलगी म्हणून राहणार. बाबा तुमची खूप आठवण येते. असं अपूर्वाने लिहिलं आहे.
अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या बालपणीची आठवण शेअर केली आहे. यामध्ये अपूर्वा आपल्या बाबांच्या हाताला धरून चालत आहे. मी तुमच्यासाठी कायम अशीच लहान मुलगी म्हणून राहणार. बाबा तुमची खूप आठवण येते. असं अपूर्वाने लिहिलं आहे. sakal
भार्गवीने देखील आपल्या रियल आणि रील अरयुष्यातील वडिलांचे फोटो शेअर करत दोघांचेही आभार मानले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही जागा केला असं तिने म्हंटलं आहे.
भार्गवीने देखील आपल्या रियल आणि रील अरयुष्यातील वडिलांचे फोटो शेअर करत दोघांचेही आभार मानले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही जागा केला असं तिने म्हंटलं आहे. sakal
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या लहानपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो कोलाज करत ते पोस्ट केले आहेत. माझे वडील माझे हिरो आहेत असे ती म्हणते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या लहानपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो कोलाज करत ते पोस्ट केले आहेत. माझे वडील माझे हिरो आहेत असे ती म्हणते. sakal
अभिनेत्री रूपाली भोसले हिने देखील वाडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिले आहे. वडील ते आपल्या आयुष्यात प्रकाशवाट निर्माण करणारे असतात असे कॅपशन तिने दिले आहे.
अभिनेत्री रूपाली भोसले हिने देखील वाडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिले आहे. वडील ते आपल्या आयुष्यात प्रकाशवाट निर्माण करणारे असतात असे कॅपशन तिने दिले आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com