sakal

बोलून बातमी शोधा

Satara : गद्दारांना माफ करणार नाही; बंडखोर आमदारांविरुध्द शिवसेना आक्रमक

Maharashtra Political Crisis

शिवसेना (Shiv Sena) गद्दारांना कधीही माफ करणार नाही.

सातारा : शिवसेना (Shiv Sena) गद्दारांना कधीही माफ करणार नाही, उद्धवसाहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विजय असो.., शिवसेना जिंदबाद.., आवाज कुणाचा शिवसेनेचा... अशी घोषणाबाजी करत साताऱ्यातील शिवसैनिकांनी आज बंडखोर आमदारांचा निषेध नोंदवला.

यावेळी शिवसैनिक गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या घरासमोर आंदोलनासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी (Satara Police) पोवईनाक्यावर अडवत त्यांना देसाईंच्या घराकडं जाण्यापासून रोखलं.

शिवसेनेत सध्या दोन गट पडले असून एकाबाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक तर दुसरीकडं बंडखोरी केलेल्या आमदारांचे समर्थक अशी परिस्थिती निर्माण झालीय.

या परिस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या साताऱ्यातील शिवसैनिकांनी आज संतप्त होत बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली. शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना तिथं जाण्यापासून रोखलं, त्यामुळं पोवईनाक्यावरच आंदोलन झालं.

यावेळी बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (फोटो : प्रमोद इंगळे)