T20 World Cup: आणखी एका माजी कर्णधाराला पाकिस्तानने दिली संधी

T20 World Cup: आणखी एका माजी कर्णधाराला पाकिस्तानने दिली संधी

Pakistan squad for ICC Men's T20 World Cup : विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघे काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात आणखी एक बदल केला आहे. शोएब मकसूद पाठदुखीमुळे वगळून त्याच्याऐवजी माजी कर्णधार शोएब मलिकची निवड केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी केवळ दुखापतीमुळे हुकल्यामुळे शोएब मकसूद निराशा झाला, परंतु दुखापती हा खेळाचा भाग असतो. यातून मी नक्की सावरेन आणि भविष्यासाठी तयार होईन, असे मकसूदने सांगितल्याचे पाक क्रिकेटने स्पष्ट केले. मकसूदच्या ऐवजी निवड करण्यात आलेल्या शोएब मलिकचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल, असे पाक निवड समितीचे अध्यक्ष महम्मद वसीम यांनी म्हटले आहे. २००७ च्या पहिल्या द्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी असलेला शोएब त्यानंतर २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६ मध्येही होता. सध्याच्या सघात शोएब मलिक सर्वात अनुभवी पाकिस्तानी खेळाडू आहे. शोएबच्या निवडीनंतर अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूने त्याचं अभिनंदन केलं आहे. विश्वचषक स्पर्धेत शोएबच्या अनुभवाचा पाकिस्तान संघाला फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

एक दिवस आधीचच तीन बदल -

आयसीसीने 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत टी-20 संघात बदल करण्याची मूभा दिली आहे. त्यानुसार शुक्रवारीच पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या संघात तीन बदल केले होते. आजम खान, मोहम्मद हसनैन आणि खुशदील शाह यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांच्याजागी माजी कर्णधार सरफराज अहमद, फखर जमान आणि हैदर अली यांचा समावेश करण्यात आला. मिस्बाह उल हकने मुख्य कोच पदाचा राजीनामा दिल्यानंतर फिरकी गोलंदाज शकलेन मुश्ताक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. 24 ऑक्टोबर रोजी भारताविरोधातील सामन्यापासून पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे.

पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकासाठीचा संघ -

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (विकेटकीपर)), शाहीन शाह अफरीदी आणि शोएब मलिक.

रिजर्व्ह खेळाडू: खुशदिल शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com