Ajit Pawar : अजित पवार गटाकडून दोन मोठ्या नियुक्त्या; मुंबई विभागासाठी 'यांच्यावर' विश्वास

ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर दोन पक्षांच्या दोन स्वतंत्र कार्यकारिणी स्थापन करण्यात येत आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे.

अजित पवार गटाकडून मुंबई विभागासाठी दोन मोठ्या नियुक्त्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये नरेंद्र राणे आणि शिवाजी नलावडे यांचा समावेश आहे. या दोघांकडे मुंबई कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलीय.

ajit pawar
Aaditya Thackeray: "एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर..."; भूपेंद्र पटेलांना आदित्य ठाकरेंचा सल्ला

मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भात निवडणूक आयोगामध्ये सुनावण्या सुरु आहेत. अजित पवार गटाकडून शरद पवारांवर आक्षेप घेण्यात आले. ते घरच्यासारखा पक्ष चालवतात, त्यांचीच निवड झाली नसल्याने ते इतरांच्या निवडी कशा करु शकतात? असे मुद्दे उपस्थित करण्यात आले.

दुसरीकडे दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने कॅवेट दाखल केलं असून निवडणूक चिन्हासंदर्भात निर्णय देताना आधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, असं कॅवेटमध्ये म्हटलं आहे.

ajit pawar
Maratha Reservation : हा घ्या पुरावा! कुणबी पुराव्यांसाठी मराठ्यांनी आणली 250 वर्षांपूर्वीची भांडी

शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका ही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आहे. बंडखोर आमदारांचं प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना सुचित करावं, असं त्यात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com