

UPSC Exam Result 2025: कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा युवक मोठ्या जिद्दीने आयपीएस झाला. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील माळरानावर मेंढरे चारत होता. आज आयपीएस झालेल्या बिरदेव डोणे याला काहीच दिवसांपूर्वी पोलिसांचा विचित्र अनुभव आला होता. दुर्दैवाने बिरदेवचा फोन चोरीला गेला होता. पण, आई-वडील आणि भावाला त्याने फोन हरवला, असे न सांगता फोन बंद झाल्याचे त्याने सांगितले होते.