

Manoj Jarange
esakal
Jalna: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यात ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संवाद साधणार आहेत. कुणबी नोंदी असूनही कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.