Padm Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री

padma award 2023 announced parshuram khune Zadipatti Rangbhumi artist from Gadchiroli  got padma shri award
padma award 2023 announced parshuram khune Zadipatti Rangbhumi artist from Gadchiroli got padma shri award

Padm Awards 2023 : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आ आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.

परशुराम कोमाजी खुणे, गडचिरोली येथील झाडीपट्टी रंगभूमी कलाकार आहेत. त्यांनी कला (नाट्य) क्षेत्रात 5,000 हून अधिक नाटकांच्या कार्यक्रमांमध्ये 800 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री.भारत सरकारने 1954 मध्ये या नागरी पुरस्कारांची घोषणा केली होती आणि काही वर्षे वगळता हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिले जातात.आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये सहा पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री  पुरस्कारांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com