"माझे शब्द लिहून घ्या..बाप बेटा जेल जायेंगे"; संजय राऊतांच ट्विट

sanjay raut twitter nitesh and narayan Rane with 3 Central agency officials will go behind bars
sanjay raut twitter nitesh and narayan Rane with 3 Central agency officials will go behind bars sanjay raut

महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेत्यांनर किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर संजय राऊत यांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रत्युतर दिलं होतं. यांनंतर भाजप-शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरुच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा ट्विट करत नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे याच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे, त्यांनी ट्वटमध्ये - माझे शब्द लिहून घ्या.. "बाप बेटा जेल जायेंगे", असं म्हटलं आहे.

राऊत यांनी पुढे लिहिलं आहे की, '... आणि खात्री बाळगा, बाप आणि मुलगा व्यतिरिक्त, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे "वासुली एजंट" देखील तुरुंगात जातील. महाराष्ट्र झुकेगा नही!' या ट्विटसोबत संजय राऊत यांनी वाघाचा फोटो पोस्ट केला असून या सोबत महाराष्ट्र झुकेगा नही असे देखील म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याआधीही अनेकदा आरोप केला आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून राजकीय विरोधकांवर दबावासाठी वापर केला जातो. याआधी पत्रकार परिषदेत राऊत यांनी काही नेत्यांवर घोटाळ्याचे आणि भ्रषाचाराचे आरोप केले होते.

sanjay raut twitter nitesh and narayan Rane with 3 Central agency officials will go behind bars
रशिया-युक्रेन युद्धाशी बॉबी देओलचं नाव का जोडलं जात आहे?

सजय राऊत यांनी त्यांनी सांगितलं की, विशिष्ट पद्धतीने काही व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास संस्थांचा चुकीचा वापर होत आहे. एजंटच्या माधअयमातून जबरदस्तीने वसुली केली जात असून यात काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात आपण पंतप्रधान कार्यालयाकडे पुरावे दिले असल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितले होते.

sanjay raut twitter nitesh and narayan Rane with 3 Central agency officials will go behind bars
बायडेन यांचे पुतिन यांना चिमटे; वाचा भाषणातले 8 महत्वाचे मुद्दे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com