Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Kundan Sankhe Bail Rejected | Palghar Relief Hospital Assault Case : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून साक्षीदारांवरील संभाव्य दबावाबाबत चिंता व्यक्त केली.
Kundan Sankhe Bail Rejected | Palghar Relief Hospital Assault Case :

Kundan Sankhe Bail Rejected | Palghar Relief Hospital Assault Case :

esakal

Updated on: 

पालघर : पालघर येथील रिलीफ रुग्णालयात झालेल्या राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन बाळकृष्ण संखे यांना मोठा धक्का बसला आहे. जामिनासाठी दाखल केलेला त्यांचा अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सागर नारायणराव पाटील यांनी आज (सोमवार, ता. २३) फेटाळून लावला. राजकीय ताकदीच्या पार्श्वभूमीवर साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची तसेच पुराव्यांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...