महाडमध्ये व्यापारी संकुल आणि सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी 30 कोटी रू चा निधी देण्याची उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाडमध्ये व्यापारी संकुल आणि सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी 30 कोटी रू चा निधी देण्याची उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published on

महाडमध्ये व्यापारी संकुल व सांस्कृतिक भवनासाठी ३० कोटींच्या निधीची मागणी
उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाड, ता. २२ (बातमीदार) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राखीव भूखंडावर व्यापारी संकुल आणि सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी नगर परिषदेला तीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस महाड दौऱ्यावर असताना संदीप जाधव यांनी निवेदन दिले आहे.
महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक शहर असून, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्याही वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नगर परिषदेचा प्रशस्त भूखंड व्यापारी संकुल आणि सांस्कृतिक भवन यासाठी राखीव असून, त्या ठिकाणी ही वास्तू उभारण्यात यावी, हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे महाडकरांचे स्वप्न आहे. दरम्यान, चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस महाडमध्ये आले असता, संदीप जाधव यांनी भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले, तर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे हे याबाबत फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com