

दहिसरमध्ये पूल, स्कायवॉकचे काम रखडले!
- खर्चामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ; वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : दहिसरमधील वाहतूक पूल व स्कायवॉकचे काम रखडल्याने या कामाच्या खर्चामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे. पालिकेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिक करीत आहेत.
आर उत्तर व आर दक्षिण विभागातील एन. एल. कॉम्प्लेक्स येथे रुस्तमजी शाळेजवळ, आनंदनगर येथे वाहतूक पूल व शताब्दी रुग्णालयाच्या वरचापाड्याजवळ स्कायवॉक बांधण्याबाबतच्या कंत्राटामध्ये फेरफार करण्यात आला आहे. स्कायवॉकचे काम अपूर्ण असून खर्च १०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पूल विभागाच्या माध्यमातून स्कायवॉकचे काम सुरू आहे. कंत्राटदार मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरकडून हे काम सुरू आहे. दहिसर (पूर्व) येथील आर/उत्तर विभागातील शक्ती नगर, नरेंद्र पार्क बिल्डींगजवळील एन.एल. कॉम्प्लेक्स येथे धसकवाडी बाजूस जाण्यास उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रशासकीय मंजुरीने समाविष्ट करण्यात आले आहे.
पूल बांधकामाच्या जागी अतिप्रमाणात विद्युत वाहिन्यांचे व जलवाहिन्यांचे जाळे होते. काम सुरू असताना ते जाळे स्थलांतर करणे शक्य नसल्याने काळजीपूर्वक सुरक्षेसह अतिरिक्त बाबींचा वापर करून काम करण्यात आले. एन. एल. कॉम्प्लेक्समधील पूरपरिस्थिती नियंत्रण दरवाजा स्थलांतर करणे आवश्यक असल्याने आणि मालाड पश्चिमेतील मीठ चौकी जंक्शन येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथे एकतर्फी मार्ग उड्डाणपूल बांधण्याचे काम समाविष्ट करण्यात आले. मूळ कामाच्या अंदाज रकमेमध्ये आमूलाग्र वाढ झाल्याने कंत्राटामध्ये फेरफार करण्यात येणार आहे.
पी/उत्तर विभागातील मालाड (पश्चिम) येथील मीठ चौकी जंक्शनच्या दक्षिण बाजूच्या हद्दीत हलक्या वाहनांना जाण्यासाठी भार्वे रोडवर एकतर्फी मार्ग उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मूळ कामाची कंत्राट किंमत ९५ कोटी ८९ लाख ९० हजार ९५५ रुपये इतकी होती. वाढीव कामासहित मूळ कामाचा सुधारित कंत्राट रक्कम एकूण १,०४ कोटी ९० लाख ६० हजार १२८ रुपये एवढा असून हा मूळ कंत्राट रकमेच्या ९.३९ टक्केपेक्षा जास्त आहे. अतिरिक्त कामाच्या मूळ अंदाजित रकमेत ११ कोटी ७८ लाख २४ हजार ५९७ इतक्या रकमेची वाढ झाली आहे.
१८ महिन्यांचा कालावधी
कामाची मूळ कंत्राट किंमत ९५ कोटी ८९ लाख ९० हजार ९५५ इतकी असून कंत्राट कालावधी पावसाळा धरून १८ महिने होता. कंत्राटदाराने हे काम ऑक्टोबर २०१९ पासून सुरू केले. सहा ठिकाणी पूल आणि एक ठिकाणी स्कायवॉक बांधण्याचे समाविष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.