

मॅनहोल्सच्या साफसफाईसाठी आणखी मशिन्स घेणार
वेहिकल माउंटेड सक्शन पंपची खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा एकदा दणका दिल्याने काही भागात पाणी साचले होते. यावर तोडगा म्हणून वादळी पाऊस पाण्याचे प्रवेश मार्ग स्वच्छ करण्यावर अधिक भर दिला जातोय. पालिका यासाठी रिसायकलिंग फॅसिलिटी मशिन्स वाढवणार आहेत. मलनिस्सारण (एसडब्ल्यूडी) विभागाने यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे.
मुसळधार पाऊस झाल्यानंतर बऱ्याचदा मुंबईत पाणी तुंबते. पालिका प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. तरीदेखील या वेळी मुंबईतील काही भागात पाणी तुंबल्याचे दिसले. यावर तोडगा म्हणून पालिकेकडून मॅनहोलसह पाण्याचे प्रवेश मार्ग स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. संपूर्ण मुंबईतील मॅनहोल आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी या मशीनचा वापर केला जाणार आहे.
मलनिस्सारण विभागाने स्टॉर्म वॉटर एन्टरन्सेस म्हणजेच वादळी पाऊस पाण्याचे प्रवेश मार्ग आणि एसडब्ल्यूडी मॅनहोल्सच्या साफसफाईसाठी रिसायकलिंग फॅसिलिटी मशिन्ससह (४ नग) वेहिकल माउंटेड सक्शन कम जेटिंग मशीन विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली असून पुढील आठ ते दहा महिन्यांत ही खरेदी केली जाणार आहे. पालिका प्रशासान यावर सुमारे ४० कोटी रुपये खर्च करत असून यामध्ये चार नग मशीन खरेदीसह पुढील तीन वर्षांसाठी कामकाज आणि देखभाल सेवेचा ही यात समावेश आहे.
या ठिकाणी होणार वापर
यंदाच्या पावसात ज्या ठिकाणी पाणी साचले किंवा ज्या परिसरातील मॅनहोलमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, अशा ठिकाणी या मशीनचा वापर केला जाणार आहे. यासह पाण्याचा प्रवाह मोठा असलेल्या ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यादेखील स्वच्छ केल्या जाणार आहेत. पुढील वर्षभर हे काम सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.