

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील एक लाख ४० हजार एमबीबीएस डॉक्टरांना महिन्याअखेरीस क्यूआर कोड प्रणाली लागू करणार आहे. दवाखान्याबाहेरील या प्रणालीमुळे बोगस डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे.
माहितीच्या अभावामुळे सर्वसामान्य लोक उपचारांसाठी डॉक्टर म्हणून कोणावरही विश्वास ठेवतात. अशा स्थितीत अनेक वेळा फसवणूक होते. शिवाय, अनेकांचे शारीरिक तसेच आर्थिक नुकसानही होत असते, त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांपासून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अधिकृत डॉक्टरांसाठी आता क्यूआर कोडची सुविधा दिली आहे. या प्रणालीमुळे अधिकृत डॉक्टरांबद्दलची माहिती क्यूआर कोडमुळे रुग्णांना मिळणार आहे. सद्यस्थितीत राज्यात एक लाख ९० हजार एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यापैकी ‘आयडेंटिफाय युवर डॉक्टर्स’ उपक्रमांतर्गत महिन्याअखेरीस एक लाख ४० हजार नोंदणीकृत डॉक्टरांना क्यूआर कोड दिले जाणार आहेत.
--------------------------------------
घरबसल्या डॉक्टरांची माहिती
क्यूआर कोडशिवाय मोबाईल ॲपही तयार करण्यात येत आहे. या ॲपमध्ये सर्व नोंदणीकृत एमबीबीएस डॉक्टरांची माहिती असेल. या माध्यमातून राज्यातील लोकांना घरबसल्या खऱ्या-खोट्या डॉक्टरांची माहिती मिळू शकणार आहे.
----------------------------------------
सर्व डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात क्यूआर कोड बसवणे बंधनकारक आहे. जेणेकरून रुग्णांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र, नोंदणी आदींची माहिती मिळू शकेल.
- डॉ. विंकी रूघवानी, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.