रसिक हेच नाट्य देवतेचे खरे रक्षक

रसिक हेच नाट्य देवतेचे खरे रक्षक
Published on

रसिक हेच नाट्य देवतेचे खरे रक्षक
आशीष शेलार ः राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८   : आम्ही सगळे नाटकाचे ट्रस्टी आहोत, नाट्य देवतेचे खरे रक्षक रसिक प्रेक्षक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी मंगळवारी (ता. १८) केले. शेलार यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर येथे आज ३४ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडला. यात नाट्यनिर्मितीचे प्रथम पारितोषिक भरत जाधव एंटरटेनमेंटच्या ‘अस्तित्व’ या नाटकाला, तर मल्हार संस्थेच्या ‘गालिब’ नाटकाला द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रथम पारितोषिक विजेत्या ‘अस्तित्व’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या पुरस्कार वितरणामध्ये नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, संगीत दिग्दर्शन, नाट्य लेखन, उत्कृष्ट अभिनय आदी पुरस्काराचा समावेश आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे, यांच्यासह नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
---
नाट्यनिर्मिती पारितोषिक
प्रथम पारितोषिक - अस्तित्व ( रु.७,५२,०००)
द्वितीय पारितोषिक - गालिब (रु.४,४०,०००)
तृतीय पारितोषिक - चाणक्य (रु.४,९०,०००)
----
उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक - स्वप्नील जाधव (अस्तित्व)
द्वितीय पारितोषिक -चिन्मय मांडलेकर (गालिब)
तृतीय पारितोषिक - संतोष पवार (मर्डरवाले कुलकर्णी)
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com