

अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून नव्याने नोंदणी
मुंबई, ता. २५ ः राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी सोमवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता संकेतस्थळ सुरू होणार आहे. १९ मे रोजी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; परंतु त्यांना आपला प्रवेश अर्ज भरता आला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी त्यांना देण्यात आलेल्या लॉगिन आणि पासवर्डच्या आधारावर नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
अकरावी ऑनलाइनच्या प्रवेशाचा १९ मे रोजी बोजवारा उडाला होता. या दिवशी संकेतस्थळ क्रॅश झाल्याने शालेय शिक्षण विभागाकडून ही प्रवेश प्रक्रिया सहा दिवस पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आता ही नोंदणी पहिल्या फेरीसाठी केली जाणार असून, या वेळी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. अकरावीचे ऑनलाइन प्रवेश हे राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत असून, या प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार २८१ महाविद्यालयांमध्ये २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. यात मुंबई विभागात चार लाख ६१ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीसाठी अर्ज करताना आपले पसंतीक्रम व्यवस्थित नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय लागेल, त्या ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यांनी हे प्रवेश नाकारल्यास त्यांना चौथ्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्यास बंदी घातली जाणार आहे.
...
अशी असेल प्रक्रिया...
२६ मे ते ३ जून या कालावधीत पहिल्या फेरीसाठी नोंदणी होईल. त्यात प्रवेश नोंदणी, प्राधान्यक्रम, १ ते १० महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे याचा समावेश असेल. त्यानंतर ५ जूनला या प्रवेशाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर ६ ते ७ जून या कालावधीत यादीवर लॉगिनमधून हरकती दाखल करता येतील. त्यानंतर ८ जूनला पहिल्या फेरीच्या प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल. त्यानंतर २० जूनला पहिल्या फेरीतील रिक्त जागांची माहिती जाहीर करून दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.