

महारेराकडून पाडव्याच्या मुहूर्तावर १,०६० गृह प्रकल्पांना मंजुरी
४८६ नवीन प्रकल्पांचा समावेश; मुंबईसह एमएमआरमध्ये ६०७ प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, नववर्षाच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची स्थावर संपदा क्षेत्रात परंपरा आहे. ग्राहकांकडूनही याच कालावधीत मोठ्या प्रमाणात गृह खरेदी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर महारेरा प्राधिकरणाने नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडाव्याच्या मुहूर्तावर तब्बल १,०६० गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये जवळपास ४८६ नवीन प्रकल्प आहेत तसेच मंजुरी दिलेल्या एकूण प्रकल्पांचा विचार करता ६०७ प्रकल्प मुंबईसह एमएमआरमधील असल्याचे समोर आले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या महूर्तावर विकसकांना नवीन प्रकल्प सुरू करता यावेत, जुन्या प्रकल्पांना गती देता यावी आणि घर खरेदीदारांना घरे उपलब्ध व्हावीत म्हणून महारेरा नोंदणी क्रमांक, जुन्या प्रकल्पांबाबत विकसकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पातील सुधारणांच्या १,०६० प्रकल्पांना रेरा प्राधिकरणाने मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये ४८६ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी क्रमांक दिले आहेत. विकसकांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा केलेल्या विनंतीनुसार ४२६ प्रकल्पांचे मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १४८ जुन्या प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले होते, तेही मंजूर करण्यात आलेले आहेत.
एका दिवसात २११ प्रकरणे निकाली
पाडव्याच्या एक दिवस आधी तब्बल २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १२४ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले असून, ५३ प्रकल्पांना मुदतवाढ आणि ३४ प्रकल्पांच्या प्रस्तावातील सुधारणांनाही महारेराने मंजुरी दिली आहे.
एमएमआरमध्ये सर्वाधिक प्रकल्प
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर महारेरा नोंदणी क्रमांक मिळालेल्या प्रकल्पांत मुंबई महाप्रदेशात (एमएमआर)मध्ये सर्वाधिक ६०७ प्रकल्प असून, पुण्यात ३२१, खानदेश ६३, विदर्भ ५० आणि मराठवाडा १४ तर दादरा-नगर- हवेलीमध्ये पाच प्रकल्प आहेत.
जिल्हानिहाय मंजुरी
- मुंबई शहर - ४२
- मुंबई उपनगरे - १९६
- ठाणे - १५८
- रायगड - ११०
- पालघर - ५२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.