खवय्यांवर आता दरवाढीचे सावट

खवय्यांवर आता दरवाढीचे सावट
Published on

खवय्यांवर आता दरवाढीचे सावट
हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण महागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अमेरिका-इस्त्राईल-इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठा खंडित झाला असून, त्याचा फटका भारतातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींवर बसला आहे. युद्धामुळे हॉटेल रेस्टॉरंटच्या एकूण खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात खाद्यपदार्थांचे वाढण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्‍त केली.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ एप्रिलपासून १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५ ते २१८ रुपयांची वाढ झाली. मुंबईत आता हा सिलिंडर २,०३१ रुपयांना मिळत आहे, तर दिल्लीत २,०७८.५०, कोलकाता २,२०८ आणि चेन्नईत २,२४६ रुपये झाले आहेत. गेल्या चार महिन्यांत एकूण ५०० रुपयांची वाढ झाली आहे. बीपीसीएल, आयओसी, एचपीसीएलसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी ही वाढ जाहीर केली.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल किमती ५० टक्क्यांनी वाढल्या असून, क्रूड १२० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान उद्योगांवर होत आहे. उत्पादन खर्च २० टक्क्यांनी वाढला असून, अनेक ठिकाणी जेवणाचे दर आधीच वाढवले गेले आहेत.
दरम्यान, घरगुती १४.२ किलो एलपीजी आणि विमान इंधन (एटीएफ) दर स्थिर आहेत. मार्चमध्ये घरगुती दरात ६० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, येत्या काही दिवसांत बाहेरचे जेवण, कॅटरिंग सेवा महाग होण्याची शक्यता मोठी आहे.

परिचालन खर्च अंदाजे २० टक्क्यांनी वाढला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातील ताज्या दरवाढीमुळे आधीच कमी झालेल्या नफ्यावर आणखी फटका बसला आहे. ही परिस्थिती पाहता खाद्यपदार्थांची दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही.
प्रदीप शेट्टी, प्रवक्ते
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com