

भारत विकास परिषदेच्या वतीने उपक्रम
विरार, ता. ५ (बातमीदार) : भारत विकास परिषद, भाईंदर पूर्व शाखेच्या वतीने वसई व भिवंडी तालुक्यातील सरकारी तीन शाळांना कूलर देण्यात आले. भाईंदर पूर्व येथील भारत विकास परिषद व समाजसेवा आणि जनकल्याणच्या माध्यमातून चंद्रपाडा येथील शांती गोविंद हिंदी विद्यालय, अण्णासाहेब धामणे माध्यमिक आश्रमशाळा, कामण तसेच भिवंडी तालुक्यातील जोतिबा फुले सेवा मंडळ संचालित आश्रमशाळा, भिवंडी यांना या कूलरचे वाटप करण्यात आले आहे.
प्रत्येक शाळेमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागात ७०० ते ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कूलरसाठी सीमाडजू इंडिया प्रा. लिमिटेडतर्फे सीएसआर फंडातून मदत करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाखेचे अध्यक्ष सी. ए. सुमित लखोटिया, सचिव डॉ. मेघा अग्रवाल, कोषाध्यक्ष अनिता सुरेका, सी. ए. सुरेंद्र अग्रवाल, शांती गोविंद विद्यालयाचे अध्यक्ष भरत म्हात्रे, सी. ए. भरत अग्रवाल व अतुल अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते. या कूलरमुळे विद्यार्थ्यांना थंड पाण्याची सोय झाली असून, भारत विकास परिषदेमार्फत असे विविध सेवाभावी कार्यक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन समाजसेवक पुरुषोत्तम पाटील व रमाकांत पोद्दार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.