बांधकाम व्यावसायिकाची ३.३५ कोटींना फसवणूक

बांधकाम व्यावसायिकाची ३.३५ कोटींना फसवणूक
Published on

बांधकाम व्यावसायिकाची ३.३५ कोटींना फसवणूक

मुंबई, ता. ५ ः पनवेल येथील हैदराबादच्या निजाम संस्थानाची जमीन अर्ध्या किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल ३.३५ कोटी रुपये उकळणाऱ्या भामट्यांविरोधात आंबोली पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवला.
बालाजी पवार, रमेश बनसोडे, एम. बी. शेख आणि भारत जाधव अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी पवार याने समाजकल्याण विभागाचा ओएसडी, बनसोडे यांनी या विभागाचे एमडी, शेख याने निजामाचा वारस आणि कुलमुखत्यार असल्याचे भासवून बोगस कागदपत्रे दाखवली. संस्थानाची काही जागा सिडकोने नवी मुंबई विमानतळासाठी अधिग्रहित केली असून उर्वरित भूखंड ८० कोटी किमतीचा आहे. तो निम्म्या किमतीत उपलब्ध करून देऊ, त्यासाठी दहा कोटी रुपये आगाऊ द्यावे लागतील, असे सांगितले. ती कागदपत्रे आणि व्यवहार योग्य वाटल्याने तक्रारदाराने गेल्या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ३.३५ कोटी रुपये आरोपींना दिले; मात्र व्यवहार पुढे सरकत नसल्याने चौकशीसाठी संपर्क साधला असता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले, असे त्याने पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com