

सोलर सीसीटीव्हीवरून वाद
स्थायी समितीत सत्ताधारी, विरोधक आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहरात सोलर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; मात्र पावसाळी वातावरणात कॅमेरे तग धरणार नसल्याने कंत्राटदारांवर मेहेरबानी कशासाठी, असा सवाल करत स्थायी समितीच्या बैठकीतच सत्ताधारी, विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
सीसीटीव्ही हा शहराच्या सुरक्षेचा संवेदनशील विषय आहे. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो; पण तरीही कंत्राटाचे दर वाढतच आहेत. पालिकेने स्वतःची यंत्रणा उभी करण्याऐवजी कंत्राटदारांचे पोषण का करावे, असा सवाल करत भाजपचे गणेश खणकर यांनी प्रस्तावाला विरोध केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. सईदा खान यांनी सध्याच्या सीसीटीव्ही यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे सांगितले. शहरातील अनेक कॅमेरे बंद आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचे चित्रण मिळत नाही. अशा परिस्थितीत सोलरचा नवा प्रयोग कशासाठी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी, मुंबईत पावसाचे प्रमाण जास्त असते, अशा वेळी सोलर पॅनेल किती वीज निर्माण करणार, त्याच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केला. सुरक्षेसारख्या विषयात प्रयोग करण्यापेक्षा विजेवर चालणारेच कॅमेरे बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी सहा महिन्यांत कॅमेरे बंद पडत असतील तर सल्लागार नक्की काय करतात, अशी विचारणा प्रशासनाला केली.
-------------------------
उच्च न्यायालयातील समितीच्या २००९ मधील शिफारशींनुसार हा निर्णय घेतला आहे. वायर कापल्या जाणे किंवा चोरी होणे, यावर सोलर सिस्टीम हाच उत्तम पर्याय आहे. नव्या कंत्राटात अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा समावेश असून त्याचा मासिक अहवाल न्यायालयात सादर केला जाईल.
- बिपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.