

अनिलकुमार गायकवाड
‘आयआरएफ’ अध्यक्षपदी
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाच्या (इंटरनॅशनल रोड फेडरेशन) भारतीय शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी डॉ. गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. दरम्यान, महामंडळाचे मुख्य अभियंता एस. के. सुरवसे यांचीही ‘आयआरएफ’च्या संचालक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९४८ मध्ये स्थापन झालेला आणि जिनिव्हा येथे मुख्यालय असलेला आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघ हा एक स्वयंसेवी व ना-नफा तत्त्वावर कार्य करणारा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संघटनात्मक मंच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.