निवडणूक आयुक्तांविरोधात जेन-झी आक्रमक

निवडणूक आयुक्तांविरोधात जेन-झी आक्रमक
Published on: 

निवडणूक आयुक्तांविरोधात जेन-झी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने सीएसएमटी येथे मोर्चा काढला. या वेळी निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जेन-झींचा आक्रमक पवित्रा दिसून आला. उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने तरुण-तरुणी मोर्चात सहभागी झाले. हातात फलक, पक्षाचे झेंडे आणि मतदानाच्या हक्काच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत तरुणाईने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली.
मतदान करूनही आपल्या मताचा योग्य सन्मान होत नसेल, मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळली जात असतील, तर लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल या तरुणांनी उपस्थित केला. मतदानाचा अधिकार हा केवळ मतदानाच्या दिवशीचा अधिकार नसून तो लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. मोर्चाच्या ठिकाणी ‘मतदानाचा अधिकार अबाधित ठेवा’, ‘मतदार यादी पारदर्शक करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. सोशल मीडियावर सक्रिय असलेली जेन-झी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचे चित्र सीएसएमटी परिसरात पाहायला मिळाले. ‘निवडणूक आयुक्त भ्रष्ट आहेत. हा मोर्चा जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, ’ असे इझा या आंदोलक विद्यार्थिनीने सांगितले.
‘आम्ही मतदान करतो, मग आमच्या मताचा अधिकार सुरक्षित राहायलाच हवा. ज्ञानेशकुमारांसह संबंधित सर्वांवर कारवाई व्हायला हवी, असे आदील या विद्यार्थ्याने सांगितले.
...
निवडणूक ही लोकशाहीची सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदार यादीपासून निकालापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता असली पाहिजे. तरुणांनी याबाबत प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
नताशा परेरा, तरुणी
...
हा केवळ एखाद्या पक्षाचा विषय नाही. उद्या कोणाचेही नाव मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यावर तरुणांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. आम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले असताना भाजपला त्याची मिरची झोंबत आहे.
- निखिल पवार, तरुण
...
मतदार म्हणून आमचे नाव यादीत असणे आणि आम्हाला मतदान करता येणे हा आमचा अधिकार आहे. कोणत्याही कारणाने पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये.
- योगिता कोकाटे, तरुणी
...
मला राजकारणात अजिबात रस नाही; पण राजकारणात जे चालले आहे, ते चुकीचे आहे. मतदार यादीत ज्यांनी घोळ केला आहे, त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा.
- अमृता गुणुगडे, तरुणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com