पावसाळ्यात पाण्याचा निचऱ्यासाठी अतिरिक्त पंप

पावसाळ्यात पाण्याचा निचऱ्यासाठी अतिरिक्त पंप
Published on: 

पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्यासाठी अतिरिक्त पंप
​
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पावसाळ्यात सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त पंपामुळे (उदंचन संच) महापालिकेच्या तिजोरीवर १० कोटी १५ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांतील पावसाळ्यासाठीचा हा वाढीव खर्च असून, सुधारित कंत्राट रकमेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

मुसळधार पावसात सखल भागात साचणारे पाणी नाले व मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये उपसण्यासाठी पालिका गेली १४ वर्षे भाडेतत्त्वावर उच्च क्षमता पंप वापरत आहे. पालिका आयुक्तांनी २०२४ आणि २०२५च्या पावसाळ्यासाठी ४८१ पंप बसवण्यासाठी १२१.८० कोटी रुपयांच्या मूळ कंत्राटाला मंजुरी दिली होती. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता २०२४मध्ये अतिरिक्त ४६ ठिकाणी, तर २०२५मध्ये तब्बल ८० ठिकाणी स्थानिक प्रभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी वाढीव पंपांची मागणी केली होती. कुर्ला, चेंबूर, अंधेरी, दादर, परळ, घाटकोपर, कांदिवली, मालाड व बोरिवली यांसारख्या सखल व पूरप्रवण भागांत हे अतिरिक्त पंप तातडीने कार्यान्वित करण्यात आले. अतिरिक्त पंपांच्या वापरामुळे मूळ कंत्राट रकमेवर ८.३४ टक्के वाढ झाली आहे. आवश्यक फेरफार आणि वजावटीनंतर १० कोटी १५ लाख ६० हजार ७३४ रुपयांचा अतिरिक्त खर्च आला असून, या कामाचे एकूण सुधारित कंत्राट मूल्य आता १३१.९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com