

व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या
माजी अधीक्षकांना नोटीस
राज्य वैद्यक परिषदेने स्पष्टीकरण मागवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कथित बोगस डॉक्टरप्रकरणी जवळपास वर्षभरानंतर महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेने हालचाल केली आहे. परिषदेकडे नोंदणी नसलेल्या डॉक्टरांना आयसीयूमध्ये काम करण्याची परवानगी दिल्याचा आराेप आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराज आचार्य यांना नाेटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२५मध्ये ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली हाेती. अखेर सततच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई झाल्याचे तक्रारदार ॲड. तुषार आर. भोसले यांनी म्हटले आहे.
रुग्णालयातील आयसीयूमध्ये कार्यरत काही डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय नोंदणीची आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत नसल्याची माहिती असतानाही त्यांना वैद्यकीय कामाची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही त्यात करण्यात आला आहे. तक्रारीनंतर संबंधित कागदपत्रांच्या स्पष्ट प्रती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर एमएमसीची निवडणूक प्रक्रिया आणि संकेतस्थळातील बदलांमुळे तक्रारीच्या पाठपुराव्यात अडथळे आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. अखेर जवळपास वर्षाने तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.