विमानसेवांचे नवी मुंबईतील स्थलांतर लांबणीवर

विमानसेवांचे नवी मुंबईतील स्थलांतर लांबणीवर
Published on: 

विमानसेवांचे नवी मुंबईतील स्थलांतर लांबणीवर
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे अदाणी समूहाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित स्थलांतर काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अदाणी विमानतळ समूहाला निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अदाणी विमानतळ समूहाकडून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १चे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी विमानसेवांचे काही प्रमाणात नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास अनेक विमान कंपन्यांनी विरोध केला. या विषयावर नागरी हवाई वाहतूक सचिव समीरकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेत विमान कंपन्या, अदाणी विमानतळ समूह, भारतीय विमान कंपन्यांची महासंघटना, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींसह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यात विमानसेवांचे स्थलांतर काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. तसेच नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा स्थलांतरित करण्यासाठी विमान कंपन्या आणि विमानतळ व्यवस्थापनाने ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार १३ ऑक्टोबरला स्थलांतराच्या आराखड्यावर चर्चा करून अंतिम रूपरेषा निश्चित करण्यासाठी २० ऑक्टोबरला पुन्हा बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com