मुंबई विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘फिक्की युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने गौरव

मुंबई विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘फिक्की युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने गौरव
Published on: 

मुंबई विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावर मोहर
‘फिक्की युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने गौरव
मुंबई, ता. ८ : मुंबई विद्यापीठाला ‘फिक्की युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२६’ (एस्टॅब्लिश्ड कॅटेगरी) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे २१व्या फिक्की उच्च शिक्षण शिखर परिषदेत १२वा उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार सोहळा झाला. यात माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठासह आयआयटी गांधीनगर, काशी हिंदू विद्यापीठ (बीएचयू) आणि चाणक्य राष्ट्रीय विधी विद्यापीठ या संस्थांचा समावेश होता.

संशोधनापर्यंत एकात्मिक धोरण
मुंबई विद्यापीठाने पुरस्कारासाठी सादर केलेल्या केस स्टडीमध्ये अभ्यासक्रम, संशोधन, आंतरराष्ट्रीयीकरण, प्रशासन आणि रोजगारक्षमता यांना एकत्रित करणाऱ्या ‘क्लस्टर इनिशिएटिव्हज’च्या माध्यमातून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर परिणाम साधण्याची संस्थात्मक कार्यान्वय योजना मांडली. यात उदयोन्मुख क्षेत्रांतील अभ्यासक्रम, संशोधन व नवोपक्रम, रोजगारक्षमता व उद्योजकता, जागतिक सहभाग तसेच प्रशासन व डिजिटल परिवर्तन या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.

नवोपक्रमाला चालना
मुंबई विद्यापीठाने ‘इनोव्हेशन-लेड युनिव्हर्सिटी’ म्हणून आपली ओळख अधिक बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप-टेक संशोधन, संशोधनासाठी निधी उभारणी, स्टार्टअप्स व उद्योजकतेला प्रोत्साहन तसेच उद्योगजगताशी भागीदारी यावर भर दिला आहे.
़़़़़
“फिक्की युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२६’ हा पुरस्कार म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या १६९ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला आधुनिक, संशोधनकेंद्री आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाची जोड देणाऱ्या वाटचालीचा गौरव आहे. संशोधनातून नवोपक्रम, नवोपक्रमातून रोजगारक्षमता आणि ज्ञाननिर्मितीतून सामाजिक परिवर्तन साधण्याच्या आमच्या संकल्पनेला या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.
-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com