तंबाखूमुक्ती जनजागृती व्हिडिओ स्पर्धेत वैष्णवी बारसकर प्रथम

तंबाखूमुक्ती जनजागृती व्हिडिओ स्पर्धेत वैष्णवी बारसकर प्रथम
Published on: 

तंबाखूमुक्ती जनजागृती व्हिडिओ स्पर्धेत वैष्णवी बारसकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करून तंबाखूमुक्तीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्जनशील व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२६’चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत वैष्णवी अरविंद बारसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त १ ऑक्टोबरला या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण हेल्पलाइन सेवा, टाटा मेमोरियल सेंटर आणि कर्करोग उपचार, संशोधन व शिक्षणासाठीच्या प्रगत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या तंबाखू नियंत्रण विभागाच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला देशातील आठ राज्यांतून ३६ प्रवेशिका प्राप्त झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक २३ प्रवेशिका होत्या. अजय अनंत धमाणे आणि यश भगतसिंग जाधव यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक, विनोद भगवत कापलाने आणि फातिमा झेहरा खान यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक, तर सागर सदानंद नारकर, अश्विनी प्रवीण पवार आणि सोनाली द्वारकानाथ तरमळे यांनी संयुक्तपणे चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, चार हजार, तीन हजार आणि एक हजार रुपयांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि चषक देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण हेल्पलाइनच्या १८००-११-२३५६ या टोल-फ्री क्रमांकावर मोफत आणि गोपनीय समुपदेशन उपलब्ध आहे. ही सेवा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्ये उपलब्ध असून, तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी जनजागृती करण्यावर या उपक्रमाचा भर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com